रिद्धीसिद्धीचा भाग्यविधाता, देव गजानन बुद्धीदाता
तो सुखकर्ता तो दु:खहर्ता, चरण तयाचे धरू
गणगौळण झाली सुरू
कागद करुनी या धरतीचा, कलम-कुंचला मोरपिसांचा
हार गुंफिता कवन फुलांचा, अमृत लागे झरू
गणगौळण झाली सुरू
सूर-तालांची जाता वर्दी, देवादिकांची झाली गर्दी
जमले श्रोते जमले दर्दी, त्यांची सेवा करू
गणगौळण झाली सुरू
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर- अरुण सरनाईक
चित्रपट – गणगौळण
गीत प्रकार – प्रथम तुला वंदितो, चित्रगीत