छेडियल्या तारा
ते गीत येईना जुळून !
फुलते ना फूल तोच
जाय पाकळी गळून !
आकारून येत काही
विरते निमिषात तेही
स्वप्नचित्र पुसुनि जाय
रंग रंग ओघळून !
क्षितिजाच्या पार दूर
मृगजळास येई पूर
लसलसते अंकूर हे
येथ चालले जळून !
गीत – शान्ता शेळके
संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- ∙ पं. वसंतराव देशपांडे∙ शौनक अभिषेकी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक – हे बंध रेशमाचे
राग – मिश्र मांड
गीत प्रकार – नाट्यसंगीत