हटातटानें पटा रंगवुनि जटा

हटातटानें पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरीं
मठाची उठाठेव कां तरी

वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावें परि
हरीचें नांव भवांबुधितरी

काय गळ्यांत घालुनि तुळशीचीं लांकडें
हीं काय भवाला दुर करतिल माकडें
बाहेर मिरविशी आंत हरिशिं वांकडें
अशा भक्तिच्या रसारहित तूं कसा म्हणविशी बुधा
हरिरस सांडुनि घेशी दुधा

भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा
धरिशि तरि हरिचा सेवक सुधा
शिळाटोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा
तथापि न होय हरिची कृपा
दर्भ मुष्टिच्या गर्भिं धरुनि निर्भर पशुची वपा
जाळिशी तिळा तांदुळा तुपा

दंडकमंडलुबंड माजविशि मुंड मुंडिशी तपा
न सार्थक लटक्या सार्‍या गपा
ही बारबार तलवार येईल काय पुन्हा?
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुणा
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा
सदा हरि कविरायावर फिदा

गीत – शाहीर रामजोशी

संगीत – वसंत देसाई

स्वर- जयराम शिलेदार

चित्रपट – लोकशाहीर राम जोशी

गीत प्रकार – चित्रगीत, लोकगीत