कन्या सासुर्यासीं जाये ।मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवाकेव्हां भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये ।बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी ।तैसा तुका तळमळी
गीत – संत तुकाराम
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार – संतवाणी