हरीची ऐकताच मुरली

हरीची ऐकताच मुरली
राधिका राधिका न उरली

आसावरीचे सूर कोवळे
पहाटवारा पिउनी आले
घुसळण करिता हात थांबले
डेर्‍यामधुनी दह्यादुधातुनी यमुना अवतरली

वेड असे कैसे विसरावे?
फुलातुनी गंधा तोडावे
नभातुनी रंगा वगळावे
वेडी राधा, वेडा माधव, वेडी ती मुरली

गीत – योगिनी जोगळेकर

संगीत – पं. राम मराठे

स्वर- कीर्ती शिलेदार

नाटक – रंगात रंगला श्रीरंग

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत