भाग्यवती मी त्रिभुवनि झाले । कुबेर माझा धनी ॥
तुझेच सारे वैभव येथे । मी नावाचा धनी ॥
दो दिवसाचे वैभव खोटे ।
मोल तयाचे जगास वाटे ।
तुम्हावाचुनी मातीमोल हे । नकोच असले जिणे ।
करितील हेवा सारे नवरे । पाहुनि माझं जिणे ।
भाग्यवती मी तुमची राणी ।
भाग्यवान मी नवरा म्हणुनी ।
जोवरि लाभे प्रेमाचे धन । पर्णकुटीही बरी ।
मानिसी ऐसे वाटे होइल तुझा कुबेर भिकारी ॥
गीत – मो. ग. रांगणेकर
संगीत – मास्टर कृष्णराव
स्वर- मास्टर अविनाश, ज्योत्स्ना भोळे
नाटक – कुलवधू
गीत प्रकार – नाट्यसंगीत, युगुलगीत