तरुणपणाचं कौतुक म्हणुनी

तरुणपणाचं कौतुक म्हणुनी किती नटू?
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !

करा थाट तुम्ही सरदारी
अशी बशीन तुमच्या शेजारी
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !

राजा-राणीला चौकट कसली?
मैना राघुच्या पिंजर्‍यात बसली
मैना गाईल गीत प्रीतीचे, पोपट बोले ‘विठू विठू’
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – वसंत पवार

स्वर- सुलोचना चव्हाण

चित्रपट – रंगल्या रात्री अशा

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी