मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्ही ।
निजकन्यका गणोनी । न कांहीं केले कमी ॥
उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे ।
शत जन्म घेउनी ते । फेडीन काय मी ॥
सदया मनासि ठेवा । आपुल्या असे सदा ।
उपकारबद्ध तनया । तुमची पदें नमी ॥
गीत – वि. सी. गुर्जर
संगीत – गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- बालगंधर्व
नाटक – संगीत एकच प्याला
राग – पहाडी
ताल-धुमाळी
चाल-दिल बेकरार तूने
गीत प्रकार – नाट्यसंगीत