कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय

कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई ।
स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥

रंगुनि रंगात मधुर मधुर बोलती ।
हसत हसत फसवुनी हृद्‍बंध जोडिती ॥

हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती ।
पदर पदर परि शेवटि तुटत तुटत जाई ॥

गीत – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

संगीत – गंधर्व नाटक मंडळी

स्वराविष्कार- ∙ मास्टर दीनानाथ∙ आशा भोसले( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत भावबंधन

राग – यमनकल्याण

ताल-दादरा

गीत प्रकार – नाट्यसंगीत