बहरला पारिजात दारी फुले का पडत

बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी?

माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जन तिजसी म्हणती
दुःख हे भरल्या संसारी !

असेल का हे नाटक यांचे
मज वेडीला फसवायाचे?
कपट का करिती चक्रधारी?

का वारा ही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो दौलत तिज सारी !

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- माणिक वर्मा

राग – मधुवंती

गीत प्रकार – भावगीत, हे श्यामसुंदर

  टीप – • पुणे आकाशवाणी संगीतिका ‘पारिजातक’ मधील पद.