दत्तदिगंबर दैवत माझे

दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनुसूयेचे सत्त्व आगळे
तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे

तीन शिरे कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि पायी खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे

पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्त्विक भाव उमलती,
हळू हळू सरते मीपण माझे

गीत – कवी सुधांशु

संगीत – आर. एन्‌. पराडकर

स्वर- आर‌. एन्‌. पराडकर

गीत प्रकार – भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा