डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका !
जादुगिरी त्यांत पुरी
येथ उभे राहुं नका.
घालुं कशी कशिदा मी?
होती किति सांगुं चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.
खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावुं नका !
गीत – भा. रा. तांबे
संगीत – वसंत प्रभु
स्वराविष्कार- ∙ आशा भोसले∙ जी. एन्. जोशी∙ केशवराव भोळे( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग – मिश्र मारुबिहाग
गीत प्रकार – भावगीत, नयनांच्या कोंदणी
टीप – • काव्य रचना- १८९१, देवास.• ‘डोळे तुमचे जादुगिरी’ अशी एक जुनी लावणी ऐकिवात आहे.• स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत प्रभू.• स्वर- जी. एन्. जोशी, संगीत- जी. एन्. जोशी.• स्वर- केशवराव भोळे, संगीत- केशवराव भोळे.