चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥१॥
चुकलिया माय बाळकें रडती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥२॥
वत्स न देखतां गाई हुंबरती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥
जीवनावेगळे मत्स्य तळमळती ।
झालें मजप्रती तैसें आतां ॥४॥
नामा ह्मणे मज ऐसें वाटे चित्तीं ।
करितसें खंती फार तुझी ॥५॥
गीत – संत नामदेव
संगीत – कमलाकर भागवत
स्वर- सुमन कल्याणपूर
गीत प्रकार – संतवाणी