अखेरचा हा तुला दंडवत
सोडून जाते गाव
दरीदरींतून मावळदेवा
देऊळ सोडून धाव
तुझ्या शिवारी जगले हसले
कडीकपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले
उरलं मागं नाव
हाय सोडूनी जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता
धरती दे ग ठाव
गीत – कवी संजीव
संगीत – आनंदघन
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट – मराठा तितुका मेळवावा
गीत प्रकार – चित्रगीत
टीप – • प्रतिध्वनी- उषा मंगेशकर, मीना खडीकर.