हृदयिं धरा हा बोध खरा । संसारी

हृदयिं धरा हा बोध खरा ।
संसारीं शांतिचा झरा ॥

संशय खट झोटिंग महा ।
देउं नका त्या ठाव जरा ॥

निशाचरी कल्पना खुळी ।
कवटाळिल ही भीती धरा ॥

बहुरूपा ती जनवाणी ।
खरी मानितां घात पुरा ॥

गीत – गो. ब. देवल

संगीत – गो. ब. देवल

स्वराविष्कार- ∙ शरद जांभेकर∙ बालगंधर्व∙ मधुवंती दांडेकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत संशयकल्लोळ

राग – पिलू

चाल-जल जयो ऐसी

गीत प्रकार – नाट्यसंगीत