खेळ कुणाला दैवाचा कळला

खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला

जवळ असुनही कसा दुरावा
भाव मनीचा कुणा कळावा

हार कुणाची? जीत कुणाची
झुंज चालली दोन मनांची

सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा

गीत – वंदना विटणकर

संगीत – रामलक्ष्मण

स्वर- आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर

चित्रपट – देवता

गीत प्रकार – चित्रगीत