घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लौकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढिं धार क्षिरपात्र घेउनी धेनू हंबरती
लक्षिताति वांसुरें हरी धेनुस्तनपानाला

सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होतांच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षीं

गीत – शाहीर होनाजी बाळा

संगीत – वसंत देसाई

स्वर- पंडितराव नगरकर, लता मंगेशकर

चित्रपट – अमर भूपाळी

राग – देसकार, भूप

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर