भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गऽ बा

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

निळ्या डोळ्यांवरी
मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

श्रावणाच्या सरी
पानभर थर्थरी
हिर्व्या मोराची थुई थुई थांबेना
निळ्या मोराची थुई थुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

गीत – ना. धों. महानोर

संगीत – आनंद मोडक

स्वराविष्कार- ∙ आशा भोसले∙ देवकी पंडित( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

चित्रपट – एक होता विदूषक

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी, ऋतू बरवा